पूर्वी दक्षाने बृहस्पती सव नावाचा मोठा यज्ञ केला. या यज्ञाला भगवान शंकर यांना न बोलाविता सर्व देवांना बोलावले. शिवपत्नी सती या यज्ञाला आमंञण नसतांनाही गेली. यज्ञात शिवाला अविर्भाव दिला गेला नाही. त्यामुळे सतीने यज्ञात उडी घेतली. शंकरजींना हे कळाल्यानंतर त्यांनी यज्ञाचा विध्वंस केला. सतीचे कलेवर हातात घेऊन श्री शंकर ञिलोकात हिंडू लागले. ही स्थिती पाहुन विष्णुने सुदर्शन चक्र सोडले व सतीच्या शरीराचे ५१ तुकडे केले. हे तुकडे ५१ ठिकाणी पडले. हीच ५१ शक्तीपीठे म्हणुन गणली जाऊ लागली. महाराष्ट्रात शक्तीचे साडेतीन शक्तीपीठे आहेत. कोल्हापुरची महालक्ष्मी, तुळजापुरची महासरस्वती, माहुरची महाकाली आणि सप्तशृंग गडावरील सप्तशृंगी होय. परंतु आदिशक्तीचे मूळ स्थान सप्तशृंगी हेच होय. ओंकारातील मकार पूर्ण रूप होऊन सप्तशृंग गडावर स्थिरावला म्हणून हेच मूळ रूप आणि हिच आदिमाया. १८ हातांची ही महिषासुरमर्दीनी, ही श्री महालक्ष्मी देवी, हीच महाकाली, महासरस्वती होय. ञिगुणात्मक स्वरूपात आद्य स्वयंभू शक्तपीठ म्हणून श्री सप्तशृंगी देवीचा उल्लेख पौराणिक ग्रंथातून आढळतो.
श्री सप्तशृंग निवासिनी देवी ट्रस्ट या विश्वस्त संस्थेच्या विविध योजनांसाठी खालीलप्रमाणे निधी वा देणगी स्वीकारली जाईल.
भाविकांना गडावर निवासाच्या सोयीसाठी विश्वस्त संस्थेने भक्तनिवास व्यवस्था उपलब्ध केलेल्या आहेत.
At. Post. Saptashrung Gad, Kalwan, Dist. Nashik, Maharashtra 423501