आख्यायिका

...चिक्षूर, चामर, उदग्र, महाहनू, असिलोमा बाष्कळ, परिवारित, विडाल इत्यादी राक्षस सेनापती व हजारो हत्ती घोडे, आणि कोटी कोटी राक्षस सैन्य देवीशी लढण्यात गुंतले. देवी अंबिका त्या दैत्यांशी लढता लढता जे सुस्कारे सोडत होती. त्यामुळे अनेक गण निर्माण होऊन तेही देवीला युध्दात मदत करून राक्षस सैन्याचा संहार करू लागले.

त्यानंतर देवीने केलेल्या प्रचंड घंटानादामुळे अनेक राक्षस मूर्शित होऊन पडले. ञिशुल, गदा, शक्ती, तलवार, मूसळ, बाण यांचा शञु सैन्यावर मारा केल्याने राक्षसाच्या शरीराचे तुकडे तुकडे झाले. काहींना जखमा झाल्याने ते रक्त ओकत पडले. तिकडे देवीचे वाहन सिंह हा राक्षस सैन्यात गर्जना करीत वणव्या प्रमाणे संचार करू लागला. राक्षस सैन्यात रक्ताच्या नद्या वाहू लागल्या. तर या सैन्याचा संहार करण्यासाठी देवी सज्ज झाली होती. अग्नी जशी लाकडे, गवत यांच्या प्रचंड ढिगांचा नाश करतो, त्याप्रमाणे अंबिका राक्षस सैन्याचा संहार करत होती. धड तुटलेली राक्षसांची शरीरे काही वेळ लढत होती.

राक्षस सैन्याचा प्रचंड संहार पाहून चिक्षूर हा दैत्य सेनापती अंबिकेशी युध्द करण्यास सरसावला. परंतु देवीने त्याचे धनूष्य तोडून टाकले. इतकेच नव्हे तर त्याचा रथही नष्ट केला. तेव्हा सर्व शक्ती एकवटून बाहूंवर तलावारीचा वार केला. परंतू ती तलवार मोडून पडली. चिक्षूराने शूल फेकला तेव्हा देवीने स्वत:च्या शुलाने त्या चिक्षुराचे  व शुलाचे तुकडे केले. मग चामर हा दैत्य पुढे आला. त्याने फेकलेल्या शक्तीला देवीने आपल्या हुंकारानेच निस्तेज केले. नंतर देवीच्या सिंहाने गर्जना केली. त्याने आकाशात उड्डान करून खाली येतांना आपल्या पंजानेच चामराचे शिर धडावेगळे केले. त्यानंतर देवीने उग्र, उग्रवीर्य, महाहून, उग्रमुर्ख, विडाल, दुर्धर, दुर्मुख या राक्षसांना ठार मारले. तेव्हा चिडलेल्या म्हैषासुराने रेड्याचे रूप घेतले व तो देवीच्या गणावर चालून आला. शिंगे, खुर, शेपटी, सुस्कारा तोंडाचा प्रहार अशा मुसंडीने त्याने देवी सैन्याची दाणादाण उडविण्यास सुरवात केली. परंतू देवीने पाश टाकून रेड्याला बांधले. तेव्हा त्याने सिंह, खड्गधारी पुरूष व त्यानंतर हत्ती ही रूपे भराभर घेतली. शेवटी रेड्याचे रूप घेऊन धुमाकूळ घालण्यास  प्रारंभ केला. तो गर्जना करू लागला.

युध्दस्वरूप पाहून त्याचा समाचार घेण्याचा देवीने निश्चय केला. मग देवीने मद्यप्राशन केले. युध्दप्रसंगी अशा या मद्यप्राशनामूळे देवी अधिक  क्रोधाविष्ट झाली. लाल डोळे झालेली देवी हसू लागली. 'अरे मुर्खा तुझा सर्वनाश जवळ आला आहे' असे म्हणाली. तेव्हा रेड्याचे रूप सोडून राक्षस पून्हा लढू लागला. ते पाहाताच देवीने राक्षसाचे शिर त्वरित धडावेगळे केले. आणि देवांची बाजू राखली. राक्षस सैन्याचा प्रचंड पराभव केला. राक्षस सैन्य पराभूत होताच सर्व देव विजय उन्मादात मग्न झाले. विजया मुळे आनंदीत होऊन देवांनी जयघोष केला. उद्योस्तु! उद्योस्तु!!  महापराक्रमी उन्मत झालेल्या महिषासूर व राक्षस सैन्याचा पूर्णपणे नाश झाल्यामुळे सर्व देवांनी रणचंडिकेची स्तु्ती केली. तिला संतुष्ट केले.

At. Post. Saptashrung Gad, Kalwan, Dist. Nashik, Maharashtra 423501

contact us