श्री सप्तशृंग निवासिनी देवी मातेचा कृपा - आशीर्वाद, भक्तजनांनी केलेला उदोकार, सद् विचार, सद् क्रिया अशा सत्शील – सत्वशील भावस्थितीचा हा गौरव…
दिनांक २२ सप्टेंबर, १९७५ रोजी श्री सप्तशृंग निवासिनी देवी ट्रस्टच्या विश्वस्त संस्थेचे प्रथम विश्वस्त मंडळ कार्यरत होऊन भव्यदिव्य असा प्रवास सुरु झाला. भाविकांची भक्ती, श्री सप्तशृंगी मातेचे चिरंतन अस्तित्व, श्री सप्तशृंगगड हे तीर्थक्षेत्र, भावक्षेत्र आणि निसर्गरम्य आनंदक्षेत्र असा हा प्रवास आहे.
जगभरातून दरवर्षी ४५ ते ५० लाख भाविक भक्त येतात. तिर्थक्षेत्र आणि पर्यटनक्षेत्र यांचा पवित्र संगम. भाविकांची उत्तम सोय व्हावी, ही सदिच्छा असते. सोयी - सुविधा वाढाव्यात, क्षेत्राचे पावित्र आणि महात्म्य टिकावे ही विश्वस्त संस्थेची धारणा आहे.
काही महत्वपूर्ण निर्मिती-
श्री भगवती मंदिर जीर्णोद्धार, पाय-या बांधकाम, भव्य प्रवेशव्दार, भाविकांसाठी चिंतन सभागृह, भक्तांगण, भक्तनिवास, प्रसादालय अन्नपूर्णा, धर्मार्थ दवाखाना, शिवालय तलाव जिर्णोध्दार, मंदिर क्षेत्रापर्यंत पेयजल, गडावरील अंतर्गत रस्त्यांचे कॉंक्रिटीकरण, विद्युत पुरवठ्यासाठी तीन जनरेटरची सोय.
कर्मचारी निवासस्थाने-
भक्तनिवास विस्तारासाठी जमिन मिळवण्याचे प्रयत्न. वनखात्याकडे प्रस्ताव, सकारात्मक कृती.
आध्यात्मिक आनंद साधनेसाठी मंदिर सुशोभिकरण, शैक्षणिक संस्थानिर्मिती, क्षेत्र शांतता, उदात्तता आणि पवित्रता यांच्यानिर्मीतीचे विविध कृतिकार्यक्रम आणि विस्तारकार्य.
विश्वस्त संस्थेचे विविध भाविक देणगीदार यांच्या दातृत्वाचे स्मरण आहेच. देणगीदारांची नावे म्हणजे त्यांच्या दातृत्वाचे आदर – प्रकटीकरण होय.
शासकीय सहकार्य, शासकीय निर्णय आणि शासकीय यंत्रणांची साथ, संगत – सोबत उल्लेखनीय आहे. विश्वस्त संस्थेचे दैनंदिन कामकाज सुरळीत ठेवण्यासाठी प्रयत्न अधिकारी वर्ग तत्परतेने करीत आहेत.
श्री सप्तशृंग देवी माता हे क्षेत्र सौंदर्यपूर्ण भावश्रध्दांचा सत्शील आविष्कारच आहे. विश्वस्त संस्थेला आदर वाटतो, पुण्यक्षेत्राचा, आदिमातेचा आणि भाविकांचाही.
At. Post. Saptashrung Gad, Kalwan, Dist. Nashik, Maharashtra 423501