विश्वस्त संस्थेतर्फे कोल्हापूर, सांगली, सातारा या पूरग्रस्त भागांसाठी रक्कम रु. ११ लाख मुख्यमंत्री सहाय्यता निधीत देण्यात आली. दि. ०७/१०/२०२१ शारदीय नवरात्रापासून मंदिर कोविड प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करुन भाविकांसाठी खुले करण्यात आले आहे. दि. २३/१२/ २०२१ रोजी विश्वस्त संस्थेच्या सन २०२२ च्या दिनदर्शिकेचे मा. अध्यक्ष साहेब यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.

सप्तशृंगगडावरील सुविधा-

...भक्तनिवास सुविधा-
भाविकांच्या निवास व्यवस्थेसाठी विश्वस्त संस्थेने स्वतंत्र असे भक्तनिवास बांधकाम केले आहे. त्यात सप्तशृंगी निवास, परमेश्वरी निवास, सुरत निवास, भक्तनिवास, कुदळे निवास, राजराजेश्वरी निवास अशा विविध इमारतींचे बांधकाम पूर्ण केलेलं आहे. तसेच पहिल्या पायरीजवळ उतरण्याच्या मार्गावर भक्तांगण इमारत बांधकाम पूर्ण केलेले आहे. भाविकांना गडावर निवासाच्या सोयीसाठी विश्वस्त संस्थेने भक्तनिवास व्यवस्था २१६ खोल्यांमध्ये उपलब्ध केलेल्या आहेत. भक्तनिवास कार्यालय २४ तास उघडे असते.
१) सप्तशृंगी निवास       -  ०१०
२) परमेश्वरी निवास       -  ००८
३) सुरत निवास           -  ०१७
४) भक्तनिवास           -  १२६
५) कुदळे निवास         - ०१०
६) राजराजेश्वरी निवास  -  ०३७

७) भक्तांगण            -   ००८


...अन्नपूर्णा प्रसादालय-
विश्वस्त संस्थेने दर्शनासाठी येणा-या भाविकांसाठी ना नफा ना तोटा या तत्वावर अन्नपूर्णा प्रसादालय सुरु केलेले असून त्या इमारतीत एका वेळेला सुमारे ११०० ते १२०० भाविक महाप्रसादाचा लाभ घेऊ शकतात. तसेच महाप्रसादाची वेळ सकाळी ११.०० ते २.३० व सायंकाळी ७.०० ते ९.३० या वेळेत प्रसादाचा लाभ घेतात. त्याप्रमाणे महाप्रसादासाठी रक्कम रुपये २०/- व व्ही.आय.पी कक्षात भोजन घेण्यासाठी रक्कम रुपये ६०/- या प्रमाणे महाप्रसाद दर आकारण्यात येतात. तसेच दर पौर्णिमेला महाप्रसाद सुविधा ही मोफत पुरविण्यात येते.


...पूजा विधी-
श्री भगवतीचे मंदिर सकाळी ५.३० वाजेपासून ते रात्री ९.०० वाजेपर्यंत दर्शनासाठी उघडे असते. श्री भगवतीस अभिषेक, पूजा, पंचामृत अभिषेक पूजा, सप्तशती पाठ, महानैवेद्य, नंदादीपसाठी तेल, तुप, आरती, पातळ, खण ओटी व दुग्ध पूजा साहित्य इत्यादीसाठी विश्वस्त संस्थेच्या कार्यालयात चौकशी करावी. श्री भगवतीस मंदिरात जाताना प्रवेश द्वाराजवळील / देणगी कार्यालयात श्री भगवतीसाठी आणलेले पातळ मौल्यवान वस्तूंची नोंद करावयाची असते.



At. Post. Saptashrung Gad, Kalwan, Dist. Nashik, Maharashtra 423501

contact us