नवरात्र उत्सव

पेशव्यांच्या कारकिर्दीमधीलनवरात्रोउत्सव

...महाराष्ट्रात पेशव्यांच्या कारकिर्दीमध्ये नवरात्र उत्सव कोणत्या प्रकारे साजरा केला जाई, हे पाहण्यासारखे आहे. प्रतिपदेच्या दिवशी पेशवे सरकार स्वत: घट स्थापना करून अंबेची स्थापना करीत. त्याप्रसंगी ब्रम्हा, विष्णु, महेश आणि यमाई देवी यांचे पुजन होत असे. त्याप्रसंगी जमलेले नागरीक देवीचा उदो उदो बोलून जय जयकार करीत असत.

व्दितीया : रेणुकसदी चौसष्ट योगिनींची पुजा करून कस्तुरी मळवट भरून उदो करीत.
तृतीया : अंबा अष्टाभुजा श्रृंगार घालून विराजमान होत असे.
चतुर्थी : सरकारवाड्यातील व बाहेरील नागरीकांनी निरंकार उपवास करून विश्वव्यापक भवानीला सामुदायीक प्रार्थना करावयाची.
पंचमी : श्रध्देने देवीचे पुजन करून रात्री सर्वांनी जागरण करावयाचे.
षष्ठी: दिवट्याचा गोंधळ देवीसमोर घालीत. काही वेळा पेशवे सरकार जातीने कवड्यांची माळ गळ्यात घालून जोगवा मागत असत.
सप्तमी : सप्तशृंग गडावर पेशव्यांनी जातीने आदिमायेची पूजा बांधावयाची.
अष्टमी : देवीपूजनाच्या वेळी अष्टभूजा नारायणी देवी शेषाद्री पर्वतावर उभी देखिली असा देखावा डोळ्यांसमोर उभा करून तिला अनन्यभावे शरण जावयाचे त्यावेळी भाविकांना देवीचे साक्षात दर्शन घडे असे सांगितले जाते.
नवमी : होमहवन, जपजाप्या, षोडश पक्वान्नांचा देवीला नैवेद्य, ब्राह्मन सुवासिनी, कुमारिका भोजन, विडा, दागिना देऊन त्यांची बोळवण करून त्यांना संतुष्ट करून पारायणे सोडावयाचे.
दशमी : अंबा मिरवणुकिने शिलंगणास जाई, गावाबाहेर शमीपूजन होऊन नंतर सोने लुटण्याचा कार्यक्रम झाल्यानंतर अंबा मिरवणुकीने परत येई. राजाश्रयाखाली हे शक्तीचे पूजन होत असे. म्हणून महाराष्ट्र त्यावेळी वैभवाने तळपत होता.

शमी अगर आपट्याच्या वृक्षाची पूजा शिलंगणाच्या वेळी करतात हे जरी खरे असले, तरी वास्तविक त्या वृक्षाच्या मुळाशी अपराजिता देवीची पुजा व्हावयाची असते. आदिशक्तीचेच एक रूप त्यावेळी पुजीले जाते आणि नाव मात्र अपराजिता दिलेले आहे. शब्दश: अर्थ इतकाच की कधीही व कोठेही पराजय न व्हावा यासाठीच मुख्य देवीच्या बाजुला जया व विजया या देवतांची स्थापना करून त्यांची पूजा केली जाते. या देवतेच्या आवाहनाचा मंत्र असा.

जयदे वरदे देवी दशम्यामपराजिते ! धारयामि भुजे दक्षे यशोलाभाभिवृध्द्ये !!१!!

हे अपराजिते, वरदात्री आणि जयदात्री देवी, आज दशमीच्या दिवशी मी तुला उजव्या दंडावर धारण करतो. तू माझ्या यशाची व लाभाची वृध्दी कर. या देवतेचे प्रतीमा म्हणून हळदीने पिवळ्या केलेल्या वस्त्रात मोहर्‍या व दुर्वांकुर एकत्र बांधून ती पुरचुंडी दंडावर बांधावयाची, अगर शमीवृक्षाच्या मुळाजवळ ठेवावयाची आणि पुजन करावयाचे पुजनानंतर देवीजवळ मागणे मागावे ते असे.

हारेण तु विचत्रेण भास्वत्कनकमेखला ! अपराजिता भद्ररता करोतु विजयं मम !!

दशमीच्या या देवतेच्या पूजनाचा अर्थच असा, की उत्कर्षाची अनेक क्षेत्रे मी पादाक्रांत करीन, पडलो तरी पुन्हा उठेन आणि पुढे जाईन, पराजय कधीही पाहणार नाही, मानणार नाही. सतत उद्योगी राहून उत्कर्ष गाठीन. हेच अपराजिता देवीच्या पुजनाचे रहस्य होय. अशाप्रकारे पेशवे सरकार नवरात्रोउत्सव साजरा करीत.

...मनाची उदासिनता नाहीशी होण्यासाठी हाव हाव थांबण्यासाठी, सदैव शांती लाभ मिळण्यासाठी मानसपुजा श्रेष्ठ पुजा आहे. आज नवरात्रातील सातवी माळ, पंचांग दृष्ट्या किंवा खगोलशास्त्र दृष्ट्या आज अष्टमी सह सप्तमी आहे, म्हणजे आजची सप्तमी अधिक शक्तीशाली आहे. आजच्या सातव्या माळेच्या दिवशी सप्तशृंग निवासिनी, दुर्गामाता, महिषासुरमर्दिनी, म्हणून ओळखल्य जाणार्‍या सप्तशृंगी मातेचे स्मरण करावयाचे आहे. हे देखील श्री महाकालीचे म्हणजेच श्रीपार्वती मातेचे ज्ञानयुक्त, बुध्दियुक्त जीवांना सहन होईल असे सोज्वळ सुंदर स्वरूप आहे. सकृतदर्शनी दिसायला भयप्र, अत्यंत उग्र असे रूप की जे महिषासुराचा वध करतांना धारण केलेले होते. तरी सुध्दा ही देवी महालक्ष्मी सारखी शांत असुन भक्तांबद्दल तिचा मातृत्व भाव सदैव जागृत असतो.

सप्तशृंगी देवीची सगळी उपासना अत्यंत शुध्द असुन त्यात कोठेही मलिनता नाही. पण समाजात अनेक लोकांना या देवीपुढे बळी दिले जातात म्हणुन या उपासनेविषयी थोडी संशयीत मनोवृत्ती किंवा तिटकारा वाटतो. दृढभावात हे शक्य आहे परंतु मुळातच या देवीला बळी लागत नाहीत. हा कधीतरी होणारा प्रकार मनुष्य स्वभावाचा दोष आहे. यावर साधकांनी पूर्ण विश्वास ठेवावा.

तसेच सप्तशृंगीदेवी ही ज्ञानदेवांच्या घराण्याची कुलस्वामिनी असून विठ्ठलपंतांनी आणि निवृत्तीनाथ, ज्ञानदेव सोपान, मुक्ताई या चारही भावंडांनी येथे काही दिवस वास्तव्य करून साधना केली. याच चारही भावंडांनी समाधी घेण्याच्या आधी सप्तशृंगी मातेचे दर्शन घेतले असा नामदेवांच्या अभंगात उल्लेख आहे तो असा की

सप्तशृंगलागी केली प्रदक्षिणा ! आता नारायणा सिध्द व्हावे !!
मार्गी आदिमाया पूजिली आनंदि ! म्हणती धन्य मादी वैष्णवांची !!

पहिल्या सहा सात दिवसांनंतर घटावर उगवून आलेल्या धान्याचे शेंडे आपल्याकडे वळतात, व त्या शेंड्यांवरील जे बिंदू ते एक शक्ती आपल्या शरीरकडे फेकित असतात. तशीच क्रिया सातव्या चक्रावर होत असते. म्हणूनच शिव आणि शक्ती यांचीच उपासना सर्वश्रेष्ठ उपासना ठरते आणि ती ओळख सदगुरू करुन देत असतात. ब्रम्ह, शिव आणि शक्ति या पलीकडील ज्ञान ज्यांना प्राप्तझाले तेच दत्तात्रेय, म्हणून ते गुरूदेव योगी मच्छिंद्रनाथ आणि गोरक्षनाथ यांनी याच ज्ञानासाठी श्री सप्तशृंग निवासिनी समोर अनुष्ठाण केले. देवी प्रसंन्न झाल्यानंतर त्या नाथांना सर्व शक्ती प्राप्त झाल्या. त्यावेळी त्यांना शाबरी विद्याही मिळाली. खरा शब्द शाबरी विद्या नसुन शांभवी असाच आहे. जिवा शिवाची गाठभेट घालून देणे हेच त्या विद्येचे मुख्य कार्य आहे. याच्यातुनच पुढे नाथपंथ उर्जितावस्थेवला आला आणि त्या नाथपंथातूनच पूढे संतपरंपरा निर्माण झाली.

की सप्तशृंग निवासिनी या सातव्या चक्रावरील ही शिवशक्ती प्रसन्न व्हावी असे वाटत असेल तर मस्तकाच्या वर चार बोटं शिवलिंग आहे तेथे जवळ मातोश्री (शक्ती) आहेत, जवळच श्री गजानन आहे. मद्दतकात म्हणजे सहस्त्रदलकमलात पादुका आहेत, अशी कल्पना करून मानसपुजा करावी. माननसपुजा सर्वश्रेष्ट पुजा आहे. हिनपणाने आणि नामस्मरणाने देवतेला शरण जावे. म्हणजे क्डमीख्डत्वाची भावना नष्ट होईल आणि शारीरीक कर्मे निर्मळ, शुध्द, सात्विक होऊ लागतील. शरीरावर घाव पडणार नाहीत.

नाशिक पासुन चाळीस मैलावर वणी नावाच्या गावी सप्तशृंग असलेल्या पर्वतावरील एका कपारीत ही अष्टदश भुजांची जननी उभी आहे. वनस्पतींयुक्त अशा या पर्वतावरील ती स्वामिनी आहे. नवनाथांना प्रेरणा देणारी आदिशक्ती हीच आहे. म्हणूनच हिला क्डनाथपंथाची कुलस्वामिनीक्ड असे संबोधिले आहे. ह्या देवीला अठरा हात आहेत. पैकी नऊ हात नवनाथांची शक्ती आहे. उरलेल्या नऊ हातात नवसंग्रहांची शक्ती आहे. नऊ + नऊ म्हणजे अठरा (९+९=१८). अठरा म्हणजे एक आणि आठ . १८=१+८=९ म्हणजे पुन्हा नऊच. म्हणूनच नवमी युक्त अष्टमी असेल तर होमहवनाला योग्य तिथी मानली जाते. १ ते ९ पर्यंत एक आठाचा आकडा सोडला तर प्रत्येक आकड्याला गाठ आहे. आठाला मात्र नाही. ही आठवी अवस्था मातोश्रींच्या भेटीची आहे. सात गाठी सुटल्याशिवाय आठवी अवस्था प्राप्त होत नाही. अर्थांत तोवर माऊलीचे दर्शनही होत नाही. (आपल्या लग्नविधित सप्तपदी हाच अर्थ अभिप्रेत असतो) म्हणूनच सात शिखरे असलेल्या दुर्गम पर्वतराशीत मातोश्री बसल्या आहेत. असो, काल आपण षड्चक्र दर्शन पाहिले. आपल्या शरिरात एकूण चवदा चहे आहेत. यचेग धारकांना फक्त सहाच चहे ज्ञात आहेत. बाकीची उपचक्रे आहेत. ती भाव अवस्थेमधील आहेत. ही गुंतागुत किंवा हे कार्य घड्याळातील चक्राप्रमाणे एकमेकात गुंतून आणि एकमेकांवर अवलंबून राहून चालले असते. चक्र म्हणजे पुंजके, अध्यात्मिक भाषेत पुंजक्यांनाच चक्र अशी संज्ञा आहे. या चक्रांना चावी देण्याचे कार्य सदगुरूंकडून होत असते. सदगुरूंनी चावी दिली की शरीरातील पंचवायु कार्यान्वित होऊन ही चहे घड्याळातील चक्राप्रमाणे आपोआप फिरून एक अवस्था होईल.

At. Post. Saptashrung Gad, Kalwan, Dist. Nashik, Maharashtra 423501

contact us