दैनिक पुजेचे वेळापत्रक

...सकाळी ५.३० वाजता देवीची काकड आरतीपूजा-

सकाळी ५.३० वाजता देवीची काकड आरती केली जाते. त्यावेळी श्री सुक्ताचे आवर्तन करून देवीच्या पायावर हळद, कुंकु, गुलाल व अक्षदा अर्पण केले जाते. नंतर दुध व खडी साखरेचा नैवद्य दाखवून देवीची पंचाआरती केली जाते. आरती नंतर मंत्र पुष्पांजली होऊन अपराध क्षमापण स्तोत्र म्हटले जाते. ही पुजा साधरणता १५ ते २० मिनिटांची असते.सकाळी ७.००ते ९.०० वाजता पंचामृत महापुजा-

पंचामृत महापुजा ही पुजा सकाळी ७.०० ते ९.०० या वेळेत होते. या पुजेत देवीला दही, दुध, तुप, मध, सुवासिक तेल व पिठी साखर यांची पंचामृत स्नान घातले जाते. या स्नानानंतर देवीच्या मस्तकावरून ११ लिटर दुधाचा अभिषेक श्री सुक्ताचे १६ आवर्तनाने केला जातो. मग देवीला गरम पाण्याने स्नान घालून मुर्ती वस्त्राने पुसुन कोरडी केली जाते व शेंदूर लेपण करून देवीला चोळीसह महावस्त्र (पैठणी) नेसवून कपाळावर कुंकु लावले जाते व देवीला अलंकार चढविले जातात. आरती नंतर मंत्र पुष्पाजली व अपराध क्षमापण स्तोत्र म्हटले जाते. ही पुजा दोन तासाची असते.दुपारी १२.०० वाजता महानैवेद्य आरतीपूजा-

महानैवेद्य आरती ही दुपारी १२ वाजता केली जाते. ह्या आरतीत श्रीसुक्ताचे आवर्तन करून देवीच्या पायावर हळद, कुंकु, गुलाल व अक्षदा अर्पण केले जाते. मग पुरणपोळीचा नैवद्य दाखवून पंचारती केली जाते. ही पुजा १५ ते २० मिनिटांची असते.सायंकाळी ७.०० वाजता सांज आरतीपूजा-

सायंकाळची आरती ही ७.०० वाजता होते. या पुजेत देवीला श्री सुक्ताचे आवर्तन करून देवीच्या पायावर हळद, कुंकु, गुलाल व अक्षदा अर्पण केल्या जातात व दुधाचा नैवद्य दाखवून पंचारती केली जाते. आरती नंतर मंत्र पुष्पांजली, अपराध क्षमापण स्तोत्र व सप्तशतीतला ४ था अध्याय म्हटला जातो. ही पुजा ३० मिनिटांची असते....
...

At. Post. Saptashrung Gad, Kalwan, Dist. Nashik, Maharashtra 423501

contact us