सप्तशृंगगडावर जाण्याचा मार्ग
नाशिकच्या उत्तरेस ६५ कि. मी. अंतरावर सह्याद्री पर्वताच्या पूर्व-पश्चिम पर्वत रांगेत समुद्र सपाटीपासून सुमारे ४६०० फुट उंचीवर डोंगर पठारावर हे ठिकाण आहे. येथील निसर्ग सौंदर्य व भक्तीने भारावलेलं वातावरण भाविक व पर्यटकांना नेहमीच आकर्षित करते. सप्तशृंगगडाच्या पूर्वेला असलेला मार्कंण्डेय डोंगर, गडाच्या दक्षिणेला असलेले गणेश मंदिर व सतीचा कडा, आजुबाजूला बारमाही पाण्याने तुडूंब भरलेली धरणे ही आकर्षण होय. या ठिकाणी भाविकांना येण्यासाठी नाशिक येथून नांदुरी या गावी येऊन सप्तशृंगगडावर येता येते.
गुजरात राज्यातून येणार्या भाविकांना सापूतारा, कनाशी, अभोणा मार्गे सप्तशृंगगडावर येता येते. रस्ता रूंद झाल्याने महामंडळाच्या बसेस देखील थेट गडावर येऊ लागल्या आहेत. सप्तशृंगगडावर आल्यावर उजवीकडे देवीच्या मंदिराकडे जाण्याचे प्रवेशद्वार आहेत. येथून ५१७ पाय-या चढून वर गेल्यावर डोंगराच्या कपारीत ८ फूट उंचीची शेंदूरचर्चित रक्तवर्णीय अशी महाकाय स्वयंभू सप्तशृंग आईचे दर्शन घडते. जगदंबेचे दर्शन झाल्याबरोबर मन प्रसन्न होते. भक्तांचा थकवा नाहीसा होतो. श्री भगवतीचे १८ हात असून तिला अष्टभुजा असेही म्हणतात. प्रत्येक हातामध्ये तिने वेगवेगळे आयुधे धारण केलेली आहेत. श्री भगवतीचे मूर्ती ८ फूट उंचीची असल्याने तिला ११ वार साडी लागते व चोळीला ३ मीटर खण लागतात. डोक्यावर मुकुट, कानात कर्णफुले, नाकात नथ, गळयात मंगळसुत्र व पुतळयाचे गाठले, कमरेला कमरपट्टा, पायात तोडे असे अलंकार अंगावर घालण्यात येतात.
बस वेळापत्रक
नाशिक बस स्थानकाकडून नांदुरीकडे येणार्या बसेसचे वेळापत्रक-
सकाळी : ५.३०, ६.००, ७.००, ८.१०, ९.००, ९.३०, १०.००, १०.१५, १०.३०, ११.००, ११.४५.
दुपारी : १.२०, १.३०, १.४५, २.२०, ३.३०, ४.००, ५.००, ६.००, ६.१५, ७.००, ८.१५, ९.३०.
नांदुरी बस स्थानकाकडून नाशिककडे जाणार्या बसेसचे वेळापत्रक-
सकाळी : ५.३०, ६.००, ७.००, ८.१०, ९.००, ९.३०, १०.००, १०.१५, १०.३०, ११.००, ११.४५
दुपारी नंतर : १.२०, १.३०, १.४५, २.२०, ३.३०, ४.००, ५.००, ६.००, ६.१५, ७.००, ८.१५, ९.३०
At. Post. Saptashrung Gad, Kalwan, Dist. Nashik, Maharashtra 423501